विदेशी बनावटीचे पिस्टल विक्री करणारा गजाआडदोन पिस्टलसह पाच जिवंत काडतुसे हस्तगत
सोलापूर (प्रतिनिधी) विदेशी बनावटीची पिस्टल विक्रीच्या उद्देशाने आलेल्या संशयितास गजाआड करण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले.रविवारी पहाटे ही कामगिरी पार पडली असून सुनील लक्ष्मीकांत अकोले असं त्याचे नाव आहे.त्याच्या ताब्यातून २ पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.त्याची सरकारी किंमत २ लाख १० हजार रुपयाहून अधिक असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणी टाकीजवळ एक तरुण विदेश बनावटीची पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची खबर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती,त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांनी सापळा लावून हाती पिशवी घेऊन चालत आलेल्या तरुणास शिताफीने पकडले.त्याच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता त्यात एक आणि कमरेला लावलेले एक अशी २ विदेशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली.त्याच्या झाडाझडती त्याच्याजवळ पाच जिवंत काडतुसे मिळून आली.त्याच्याकडे अधिक चौकशी करता सुनील लक्ष्मीकांत अकोले (वय-३०,रा.४३ न्यू सुनील नगर,एमआयडीसी,सोलापूर) असे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पोलीस उप-निरीक्षक विक्रम रजपूत व त्यांचे पथक हे अवैध शस्त्र बाळगणारे व विक्री करणाऱ्या संशयीतांच्या पाळतीवर होते.पथकातील पोहेकॉ.राकेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्या तरुणास सुनील नगर पाण्याच्या टाकीजवळ शिताफीने पकडण्यात यश आले.
हि कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहा.पोलीस आयुक्त संतोष गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने,पो.नि.शिवशंकर बोंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक विक्रम रजपुत,पोहेकॉ राकेश पाटील,नाना उबाळे, दिपक डोके,सचिन भांगे,पोना.मंगेश गायकवाड,पोकॉ. सुहास अर्जुन,शंकर याळगी,काशीनाथ वाघे,दिपक नारायणकर,शैलेश स्वामी,अमोल यादव,अमर शिवसिंगवाले,आमसिध्द निंबाळ,देवीदास कदम,भारतसिंग तुक्कुवाले यांनी पार पाडली.