९० व्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांना मानवंदना सोलापूरमध्ये 'आशा -९० ' कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी

सोलापूर : विख्यात गायिका आशा भोसले यांनी गायलेल्या आणि ५५ संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या ९० गाण्यांचा 'आशा-९०' हा कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिर येथे रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.आरती दीक्षित, पुणे निर्मित हा कार्यक्रम प्रथमच सोलापूर येथे होत आहे.

भक्ती गीत,भावगीत,कव्वाली,मुजरा,गझल,लावणी अशा बहारदार रचनांचे वाद्यवृंदासह सुरेल सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे.आरती दीक्षित,जितेंद्र पेठकर आणि आकाश सोळंकी हे गायक आशा भोसले यांची ९० गीते सादर करणार आहेत.संगीत संयोजन राजेश देहाडे (संभाजीनगर) यांचे आहे.३ तासात ९० गाणी सादर करून आशा भोसले यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.देणगी प्रवेशिका हुतात्मा स्मृती मंदिर येथे उपलब्ध करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी पत्रकाद्वारे दिली.देणगी प्रवेशिकांसाठी ९८२२७०९७३० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.राज्यभरात हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.१५ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे शुभारंभाचा कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.