लोकसभेची हंडी
0
१:५६ PM
लोकसभेची हंडी पंतप्रधान मोदीच फोडतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दहीहंडीच्या वेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठासून भरलेल्या विश्वासाचे नवल वाटले. मुळात शिंदे यांनी पंतप्रधानांच्या विरोधात काहीजणांना ‘द्वेष’ वाटतो. तेव्हा हा जो ‘द्वेष’ शब्द वापरला तोच चुकीचा आहे. तो त्यांनी आधी समजून घेणे गरजेचे आहे. द्वेष म्हणजे एखाद्या माणसाची प्रगती होत असेल किंबा तो मोठ्या पदावर बसलेला असेल, तर अनेकांना त्यांचा द्वेष वाटू शकतो किंवा त्यांच्याविरोधात जळफळाट होऊ शकतो. पण या ठिकाणी तसे नाही. तर पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध जसा विरोधी पक्षांना राग/संताप आहे. तसाच सामान्य माणसांच्या मनात देखील मोदींच्या विरोधात राग/संतापच आहे. मोदींनी परदेशांचे दौरे करून, भारताचे संबंध दृढ केले. अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. अतिशय चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे देशाच्या समस्या सुटत नाहीत. याउलट भाज्यांचे बाढते भाव, पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलिंडरचे चढे भाव, यामुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. बेटी पढाओ, बेटी बचाओ’चे केबळ नारे दिले जातात. पण प्रत्यक्षात अनेक मुली आज शिक्षणापासून वंचित आहेत. काही मंत्री, खासदार भ्रष्ट आहेत, पण त्यांना मात्र अभय मिळत आहे. हे मोदी यांचे अपयश आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिपाक म्हणून, सामान्य जनता अथवा विरोधकांना भयानक संताप आला आहे. तेव्हा अशी विपरीत परिस्थिती असताना, मुख्यमंत्री शिंदे मात्र, लोकसभेतील हंडी मोदीच फोडणार, असा विश्वास कसा काय व्यक्त करू शकतात ? प्रत्यक्षात, ही मोदींसाठी धोक्याची घंटा आहे असे वाटते.
Tags