श्रीक्षेत्र आळंदीसह पंढरपूर, देहू,पैठण यांसह सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा ! - आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

श्रीक्षेत्र आळंदीसह पंढरपूर, देहू,पैठण यांसह सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा ! 

- आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

आळंदी (जिल्हा पुणे) - ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर १०० टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावीत, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिर येथे ‘वस्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करावे, अशी एकमुखी मागणी वारकरी अधिवेशनात करण्यात आली.

वारकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. या प्रसंगी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.