जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या कारागृह शिपायाने स्वतःवर झाडून घेतल्या तीन गोळ्या

जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या कारागृह शिपायाने स्वतःवर झाडून घेतल्या तीन गोळ्या

सोलापूर - सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या कारागृह शिपाई विकास गंगाराम कोळपे (वय 34 रा. जेल पोलीस वसाहत सोलापूर)यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेनगार्ड येथे ड्युटी वर असताना कारागृह शिपाई विकास कोळपे यांनी स्वतःवर एसएलआर रायफलने छातीवर गोळी मारून घेतल्याने त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. याबाबत त्यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.